असं झालं तर… आयटीआर भरताना चुकीचा फॉर्म निवडला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

1 आयकर विवरणपत्र (आयटीआर) भरताना करदात्याने आपण ज्या करदाता श्रेणीत येतो त्यांच्यासाठी ठरवून देण्यात आलेलाच फॉर्म निवडणे आवश्यक आहे.

2 चुकीचा फॉर्म निवडल्यास कर परतावा अडपून पडू शकतो. उत्पन्नाचे सर्व स्रोत नमूद करणे आवश्यक आहे. स्रोत लपविल्यास 50 टक्के ते 200 टक्के दंड लागू शकतो.

3 आयटीआर-1पासून आयटीआर-7पर्यंत फॉर्म ठरवलेले आहेत. ज्या करदात्यांची 31 जुलैची मुदत हुकली आहे, ते 31 डिसेंबरपर्यंत आपले Return दाखल करू शकतात.

4 5 लाख रुपयांपेक्षा जास्त वार्षिक उत्पन्न असणाऱ्यांना 5,000 रु. तर 5 लाखांपर्यंत उत्पन्न असलेल्यांना 1,000 रु. दंड निश्चित आहे.

5 नाव, पत्ता, फोन क्र, पॅन आदी माहिती पॅन कार्डवरील माहितीशी मेळ खाणारी असावी. नोकरी बदलल्यास जुन्या कंपनीकडून मिळालेला फॉर्म 16 नव्या कंपनीला सादर करा.