माथेरान, नेरळ, कर्जतमध्ये पर्यटकांचे ‘ट्रॅफिक जाम’, 50 हजारांहून अधिक ‘पाहुणे’ डेरेदाखल; हॉटेल, धबधबे, फार्महाऊस ‘हौस’ फुल्ल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

स्वातंत्र्य दिनाची शनिवारी आलेली सुट्टी आणि रविवारची साप्ताहिक सुट्टी अशा सलग दोन दिवस सुट्ट्यांमुळे माथेरान, नेरळ आणि कर्जत परिसर पर्यटकांनी ‘हौस’ फुल्ल झाला. आज एकाच दिवशी तब्बल 50 हजारांहून अधिक पर्यटक दाखल झाले. त्यामुळे माथेरान ओव्हरपॅक झाले, नेरळपासून माथेरान घाटापर्यंत गाड्यांच्या रांगा लागून वाहतूककोंडी निर्माण झाली. या ट्रॅफिक कोंडीमुळे माथेरानमध्ये हॉटेल बुकिंग केलेले पर्यटक दुपारपर्यंत घाटातच अडकून पडले होते.

माथेरानला जाण्यासाठी पहाटेची पहिली ट्रेन पकडून सकाळी साडेपाच-सहाच्या सुमारास नेरळ स्थानकात उतरलेल्या पर्यटकांनी टॅक्सी पकडण्यासाठी रांग लावली. ती नेरळ बाजारपेठेपर्यंत पोहोचली, तर दुसऱ्या बाजूची रांग कर्जत-बदलापूर महामार्गापर्यंत गेली. माथेरान सेवा देणाऱ्या सुमारे 270 टॅक्सी घाटातील वाहतूककोंडीत आणि कर्जत बदलापूर मार्गावर अडकल्याने त्या वेळेत नेरळला पोहोचू शकल्या नाहीत, त्यामुळे सकाळी 11 वाजेपर्यंत गर्दी आणखी वाढत गेली. माथेरानमधील हॉटेल्स, नेरळमधील धबधबे आणि कर्जतमधील फार्महाक्रमेमन्त्ते बकिंग फल याले होते.

पायपीट करत जुम्मापट्टी गाठली

टॅक्सीच्या रांगेत अडीच तास थांबूनही वाहन न मिळाल्याने काही पर्यटकांनी माथेरानचा बेत रद्द करून माघारी जाणे पसंत केले, तर काहींनी पायीच घाटाची वाट धरली. नेरळहून नांगरखिंडमार्गे पर्यटक पायी जुमापट्टीपर्यंत पोहोचले. माथेरान गाठणे शक्य नसल्याने काहींनी घाटातील धबधब्यांवरच पर्यटनाचा आनंद लुटला.

नेरळच्या धबधब्यांवर मोर्चा वळवला

वाहनांची प्रतीक्षा करण्याऐवजी अनेक पर्यटकांनी माथेरानचा बेत रद्द करून त्यांनी नेरळ परिसरातील धबधबे गाठले. तीन आसनी, सहा आसनी मिळेल ती रिक्षा पकडून पर्यटकांचे लोंढे धबधब्यांकडे वळले. माथेरानमधील हॉटेल्स फुल्ल झाल्याने पर्यटकांनी नेरळ आणि कर्जतच्या फार्म हाऊसचा आधार घेतला. मुसळधार पाऊस, थंडगार हवा आणि दाट धुक्यामुळे परिसर निसर्गरम्य झाला असला तरी प्रचंड गर्दी आणि वाहतककोंडीमले अनेक पर्यटकांचा पर्यटनाचा मूड मात्र ऑफ झाला.