
किचन ट्रॉलीज बाहेरून जितक्या सुंदर दिसतात तितक्याच आतून लवकर खराब होतात. ट्रॉली महिन्यातून किमान एकदा साफ करायला हवी, यामुळे तुम्ही ट्रॉलीची चमक कायम ठेवू शकता.
किचन ट्रॉली आतून अनेकदा खूप तेलकट, चिकट होतात. अशावेळी त्या साफ करण्यासाठी एका भांडय़ात 1 चमचा मीठ, बेकिंग सोडा, डिशवॉशिंग लिक्विड आणि लिंबाचा रस मिसळून पेस्ट बनवा. आता तयार पेस्ट स्क्रबरच्या सहाय्याने ट्रॉलीला लावा आणि स्वच्छ करा. यामुळे ट्रॉलीवरील घाण आणि गंजाचे डाग निघून जातील.




























































