Photo – ऑफ-व्हाइट साडीत खुलले श्रीलीलाचे सौंदर्य

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

प्रसिद्ध दाक्षिणात्य अभिनेत्री श्रीलीलाचा ऑफ-व्हाइट लेहंगा साडीतील लूक सध्या चांगलाच चर्चेत आला आहे. श्रीलीलाने परिधान केलेली साडी तिच्या सौंदर्य आणि पारंपरिक लूकला अधिकच खुलवताना दिसत आहे. ऑफ-व्हाइट रंगाच्या या सुरेख साडीवर गुलाबी, नारंगी आणि हिरव्या रंगांची आकर्षक डिझायनर बॉर्डर दिली आहे. या पोशाखासोबत तिने गळ्यात नाजूक चोकर हार, हातात सोन्याचे कडे, अंगठी आणि कानात गुलाबी स्टड्स परिधान करून अत्यंत शोभून दिसेल असा लूक तयार केला आहे. कपाळावरील छोटी लाल टिकली तिच्या या अस्सल पारंपरिक रुपाला अधिकच सुंदर बनवत आहे. तसेच, लूक अधिक नॅचरल ठेवण्यासाठी तिने न्यूड टोन आणि ग्लोई मेकअपची निवड केली आहे.