
हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त अंधेरी येथे दहीहंडी सराव शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. शिवसेनेचे संदीप बरकडे यांनी पुरंदर प्रतिष्ठान यांच्या सहकार्याने या शिबिराचे आयोजन केले आहे. अंधेरीच्या गुंदवली गावठाण येथील साईबाबा मंदिर परिसरात शनिवारी सायंकाळी 5 ते 10 या काळात हे शिबीर पार पडणार आहे.

























































