
स्वतःच्या दोन अल्पवयीन मुली झोपलेल्या असताना त्यांचे आक्षेपार्ह फोटो व व्हिडिओ काढून ते प्रियकराला पाठवल्याचा धक्कादायक प्रकार मीरा रोडच्या नयानगर परिसरात उघडकीस आला आहे. याप्रकरणी पोलिसांनी 42 वर्षीय आईसह तिच्या 46 वर्षीय प्रियकराविरोधात पोक्सो कायद्यासह गुन्हा दाखल करून अटक केली आहे.
अटक केलेली महिला पतीपासून विभक्त असून ती आपल्या 22 वर्षीय मुलगा व 13 आणि 10 वर्षांच्या दोन अल्पवयीन मुलींसोबत मीरा रोड परिसरात राहते. मार्च महिन्यात दोन्ही मुली घरात झोपलेल्या असताना तिने त्यांचे आक्षेपार्ह चित्रीकरण केल्याचा आरोप आहे. त्यानंतर हे फोटो व व्हिडिओ व्हॉट्सॲपने प्रियकराला पाठवण्यात आल्याचे तपासात समोर आले. धक्कादायक बाब म्हणजे आरोपींनी एकमेकांचे तसेच अन्य व्यक्तींचेही असे आक्षेपार्ह व्हिडिओ मोबाईलवर शेअर केले होते.




























































