मालमत्ता कर भरण्यासाठी ऑनलाइन, ऑफलाइन सुविधा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मुंबई महानगरपालिकेच्या करनिर्धारण व संकलन खात्याकडून 1 एप्रिल ते दिनांक 31 मार्च या आर्थिक वर्षातील मालमत्ता कराची देयके https://ptaxportal.mcgm.gov.in/CitizenPortal/#/login या पोर्टलवर 21 जुलैपासून ऑनलाइन स्वरूपात उपलब्ध करून देण्यात आली आहे. तसेच छापील देयके मालमत्ता धारकांना वितरित करण्यात आली आहेत. भूखंड प्रवर्गातील मालमत्ता वगळता इतर सर्व करनिर्धारित मालमत्तांचा या देयकांमध्ये समावेश आहे. देय दिनांकाच्या आतमध्ये ऑनलाइन पद्धतीने अथवा विभाग कार्यालयातील नागरी सुविधा पेंद्रांमध्ये कर भरण्याची सुविधा उपलब्ध आहे. विहित मुदतीत मालमत्ता कर भरणा न केल्यास महानगरपालिका अधिनियमातील कलम 202 अन्वये दंडात्मक कारवाई होऊ शकते. दंडात्मक कारवाई होऊ नये, यासाठी मालमत्ता धारकांना वेळेत कर भरणा करावा, असे आवाहन महानगरपालिकेकडून करण्यात आले आहे.