
स्विगीचे काम करणाऱ्या 43 वर्षीय व्यक्तीने पैसे दिले नाही म्हणून त्याच्या पोटात चापू भोसपून त्याची तिघा नशेबाजांनी हत्या केल्याची घटना वडाळ्याच्या शांतीनगर येथे घडली. वडाळा टी. टी. पोलिसांनी आरोपींना अटक केली आहे.
शनिवारी रात्री दीड वाजण्याच्या सुमारास शांतीनगर येथे हत्येची घटना घडली. सुरेश यादव (43) हा स्विगीचे काम करत होता. शनिवारी रात्री तो शांतीनगर परिसरात आला असता तिथे त्याला तिघा नशेबाज तरुणांनी अडवले आणि ते सुरेशकडे जबरदस्ती पैशांची मागणी करू लागले. पण सुरेशने पैसे देण्यास नकार देताच दोघांनी त्यांचे हात पकडून ठेवले आणि एकाने खिशातून चापू काढून तो सुरेशच्या पोटात भोसकला. यात गंभीर जखमी झालेल्या सुरेशचा शीव इस्पितळात मृत्यू झाला. दरम्यान गुन्हा करून पसार झालेल्या तिघांनाही वडाळा टी. टी. पोलिसांनी शोधून अटक केली.






























































