शिवसेनेकडून आज गुणवंत विद्यार्थ्यांना टॅब, लॅपटॉपचे वाटप, शिवडी विधानसभेच्या वतीने सोहळ्याचे आयोजन; संजय राऊत यांच्या हस्ते विद्यार्थ्यांचा सन्मान

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

शिवसेना शिवडी विधानसभा मतदारसंघाच्या वतीने माँसाहेब सौ. मीनाताई ठाकरे यांच्या स्मृतिदिनाचे औचित्य साधून विभागातील दहावी-बारावीत ९० टक्क्यांपेक्षा अधिक गुण प्राप्त केलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला आहे. हा सोहळा उद्या, रविवारी सायंकाळी ६ वाजता ‘राष्ट्रीय मिल मजदूर संघ’, गं. द. आंबेकर मार्ग, परळ येथे पार पडणार आहे. शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांच्या हस्ते विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात येणार आहे.

गेली सलग अकरा वर्षे आमदार अजय चौधरी यांच्या वतीने हा सोहळा आयोजित केला जात आहे. या सोहळ्यात किमान २०० ते २५० विद्यार्थ्यांचा गौरव व पालकांचा सत्कार केला जातो. दहावीमध्ये गुणवत्तेनुसार अर्ज प्राप्त झालेल्या ५० विद्यार्थ्यांना टॅब, तर बारावीमध्ये गुणवत्तेनुसार अर्ज प्राप्त झालेल्या ५० विद्यार्थ्यांना लॅपटॉपचे वाटप करण्यात येणार आहे. तसेच उर्वरित विद्यार्थ्यांना शालोपयोगी आकर्षक भेटवस्तू दिल्या जाणार आहेत. या सोहळ्याला शिवसेना नेते-खासदार अरविंद सावंत, शिवसेना सचिव सुधीर साळवी, आमदार महेश सावंत, विभागप्रमुख आशिष चेंबूरकर आणि विभाग संघटक किशोरी पेडणेकर यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे.