कोकणवासीयांना खूशखबर; मुंबई-सावंतवाडी आणखी 4 गणपती विशेष ट्रेन धावणार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

गणपती उत्सवाच्या पार्श्वभूमीवर कोकणात जाणाऱया गणेशभक्तांच्या सोयीसाठी मध्य रेल्वेने शुक्रवारी आणखी चार गणपती विशेष ट्रेनची घोषणा केली. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) ते सावंतवाडी रोडदरम्यान अतिरिक्त 4 गणपती विशेष गाडय़ा चालवण्यात येणार आहेत. शुक्रवारी जाहीर केलेल्या चार गणपती विशेष गाडय़ा 19 सप्टेंबर आणि 26 सप्टेंबर रोजी धावणार आहेत. गाडी क्रमांक 01009 विशेष छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून 19 सप्टेंबर व 26 सप्टेंबर रोजी दुपारी 1.45 वाजता सुटेल आणि सावंतवाडी रोड येथे दुसऱया दिवशी पहाटे 3 वाजता पोहोचेल. तसेच गाडी क्रमांक 01010 विशेष गाडी 20 सप्टेंबर आणि 27 सप्टेंबर रोजी पहाटे 4.05 वाजता सावंतवाडी रोड येथून सुटेल आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे त्याच दिवशी सायंकाळी 6.15 वाजता पोहोचेल.