आरोग्य – दातांची काळजी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> डॉ. आशुतोष कुलकर्णी

लोकांच्या दृष्टीने दात हा सर्वात दुर्लक्षित अवयव असला तरी त्याचे शरीराच्या आरोग्याच्या दृष्टीने अतिशय महत्त्व आहे. दातांचे आणि तोंडाचे आरोग्य चांगले ठेवावे आणि दातांची काळजी कशी घ्यावी याबाबत जाणून घेऊया.

एक रुग्ण दवाखान्यात तोंडात फोड आल्याची पार घेऊन आला. गेले काही आठवडे या डॉक्टरकडून त्या डॉक्टरकडे फरक नाही म्हणून फिरत होता. तपासल्यावर लक्षात आले त्याच्या जिभेला जिथे दात घासत आहेत तिथे ती जखम आहे. दात अतिशय धारदार झाले होते. मी त्याला दाताच्या डॉक्टरकडे तपासून घ्यायला सांगितले. त्याने आश्चर्याने विचारले, ‘दात तर माझे चांगले आहेत. मग दातांचा डॉक्टर कशाला?’

हे अज्ञान तोंडाचे विकार अगदी पान्सरपर्यंत पोचण्याचं कारण ठरू शकते. जसा फॅमिली डॉक्टर तसा कुटुंबाचा दातांचा डॉक्टर हवा. दात दुखल्यावरच दातांच्या डॉक्टरकडे जाण्यापेक्षा वर्षातून एकदा तरी दातांची आणि तोंडाची संपूर्ण तपासणी करून घेणे गरजेचे आहे.

prevention is better than cure hes#ee crisis management मध्ये लोकांना जास्त धन्यता वाटते. दात प्रचंड दुखायला लागला तरच दातांच्या डॉक्टरला दाखवायचे. तोपर्यंत घरगुती उपाय करत रहायचे. त्यापेक्षा वेळीच दातांचे आजार ओळखून दातांचे आणि तोंडाचे आरोग्य चांगले ठेवावे यासाठी हा लेख आमच्या दंत चिकित्सक मित्रांच्या सल्ल्याने लिहीत आहे.

लोकांच्या दृष्टीने दात हा सर्वात दुर्लक्षित अवयव असला तरी त्याचे शरीराच्या आरोग्याच्या दृष्टीने अतिशय महत्त्व आहे. योग्य प्रकारे चावून न खाता आल्यामुळे शरीराचे कुपोषण होऊन आरोग्य बिघडते. त्यामुळे दातांची काळजी नियमित घेणे आवश्यक आहे.

दात उत्तम असणे हे आपल्या अस्थी धातू उत्तम असण्याचे लक्षण आहे. त्यामुळे आहारात कॅल्शियम असणे आवश्यक आहे.
अगदी लहान वयात दातांची तपासणी करून घेणे गरजेचे आहे. वेळीच किडणारे दात ओळखून त्यावर उपचार केल्यास त्याचे पुचे आरोग्य चांगले राहते. दुधाचे दात म्हणजे पडणारच. त्याला काय वाचवायचे, या भ्रमात दुधाच्या दातांबरोबर आलेले कायम दातसुद्धा खराब होतात. त्यामुळे वेळीच निदान आणि उपचार करून घेणे आवश्यक आहे.

पूर्वीचे दातांचे उपचार आणि आता होणारे उपचार यात बराच फरक पडलाय. आता दात वाचवण्याकडे जास्त कल असतो. त्यासाठी आधुनिक उपकरणेही उपलब्ध आहेत .

रात्रीचे दूध पिऊन चूळ न भरता झोपणे, रात्री दात न घासणे यामुळे शाळेतील मुलांचे दात मोठय़ा संख्येने किडलेले असतात स्वत: पालकांनी रात्री झोपण्यापूर्वी दात घासण्याची सवय लावून घेतली तर मुलेही त्याचे अनुकरण करतील.

मुलांचे मधल्या वयात दात मोठय़ा संख्येने एकाच ठिकाणी येणे, वेडेवाकडे होणे यासाठी योग्य उपचार घेतल्यास भविष्यात दात अधिक बळकट राहतील

दातांसाठी हजारो टूथपेस्ट बाजारात उपलब्ध आहेत. त्यांच्या जाहिरातींवर अब्जावधी रुपये खर्च होतात. त्यांचा उपयोग योग्य प्रकारे ब्रश फिरवल्यास होतो. पेस्ट कुठलीही असो. दातांच्या डॉक्टरांना विचारून ब्रश कसा करायचा याचे तंत्र शिकून घ्या आणि कुठली पेस्ट वापरायची तेही विचारून घ्या.

अपघाताने दात पडल्यास त्याला सलाईन, दूध किंवा लाळेमध्ये टाकून लवकरात लवकर दातांच्या डॉक्टरकडे नेल्यास दात वाचू शकतो. पडलेला दात जोरात घासून स्वच्छ करू नये, जसा आहे तसाच घेऊन जावा. तरच दाताचे मूळ पुन्हा धरू शकते. वर्षातून एकदा तरी डॉक्टरांकडून दात स्वच्छ करून घ्या. दाताच्या मुळाशी आलेले किटण काढल्यास दाताचे आयुष्य आणि वर्षातून एकदा तोंडाचीही तपासणी होईल.

जिभेचा घशाकडचा भाग ब्रशच्या मागच्या खरखरीत भागाने स्वच्छ घासा, जेणेकरून तोंडाची दुर्गंधी कमी होईल. डॉक्टरांना विचारून जात्यादी तेल, इरिमेदादी तेल अथवा सैंधव घालून तीळ तेल याने गंडूष कवळ करावे. त्याने दातांचे आणि तोंडाचे आरोग्य चांगले राहते. संकट आल्यावर धावण्यापेक्षा, तहान लागल्यावर विहीर खणायला सुरुवात करण्यापेक्षा वेळीच उपाययोजना केली तर दातांचे आणि त्याबरोबर शरीराचे आरोग्य उत्तम राहील.

[email protected]