असं झालं तर… घरमालकाने मनमानी भाडे मागितले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
How to Repay Your Home Loan Faster Smart Prepayment Strategies

घरमालक कराराच्या मध्यात अचानक भाडे वाढवण्याची धमकी देत असल्यास हिंदुस्थानी कायदा आणि आदर्श भाडेकरू कायद्याअंतर्गत भाडेकरूंना कायदेशीर हक्क दिलेत.

Transfer of Property Act, 1882 च्या कलम 108 नुसार जोपर्यंत भाडेकरू भाडे देत आहे तोपर्यंत त्याला मालमत्ता स्वतःकडे ठेवण्याचा अधिकार आहे.

घरमालक आणि भाडेकरूमध्ये रेंट अग्रीमेंट झाले असेल आणि संपूर्ण कालावधीसाठी भाडे निश्चित असेल, तर मालक त्या कालावधीत नव्याने भाडय़ाची मागणी करू शकत नाही.

करारामध्येच भाडेवाढीसंबंधी कलम असेल तर त्यानुसार भाडेवाढ शक्य आहे. या कालावधीत मालक पूर्वसंमतीशिवाय भाडय़ात एक रुपयानेही वाढ करू शकत नाही.

देशाच्या बहुतेक भागांमध्ये नूतनीकरणाच्या वेळी 8-10% वाढ करणे सामान्य आहे. नवीन भाडे लागू करण्यापूर्वी घरमालकाला किमान 3 महिन्यांची पूर्वसूचना देणे अनिवार्य आहे.