संत जानकीबाई

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

गुजरातमधील गणदेवी हे छोटेसे गाव, जे आता संत जानकीआईंच्या पदस्पर्शाने तीर्थक्षेत्र बनले आहे. ‘तुज संगे गे आम्ही राहू। सुख दुःख सारे पाहू।।’ असे साक्षात देवाकडून संत जानकीआईंना लाभलेले म्हणणे, ही वदंता हे त्यांच्यातील संतत्व सिद्ध करणारे आहे. जानकीआईंनी प्लेगच्या महामारीत घरोघरी जाऊन रुग्णांची सेवा केली. ज्यांना सर्वत्र ईश्वर दिसतो, त्याच्या वाटय़ाला अखंड प्रेम लाभते आणि त्याला मनुष्य, पशुपक्षी सगळे सारखे दिसतात. प्रेम आणि संयम हेच प्रत्येक काळात तारून नेणारे आहे, अशी शिकवण त्यांनी दिली. त्यांची शिकवण आजही तितकीच लागू पडते आणि भक्तगणांकडून ती आचरणात आणली जाते. गणदेवी हे गाव संत जानकीआईंच्या कृपेने पावन झाले आहे ते यामुळेच.