सरनोबत नरवीर पिलाजी गोळे

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सरनोबत पिलाजी गोळे हे छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, छत्रपती राजाराम महाराज आणि छत्रपती शाहू महाराज अशा चार छत्रपतींच्या काळात स्वराज्याशी प्रामाणिक आणि निष्ठावान राहिलेले सरदार. छत्रपती शिवाजी महाराजांनी जावळी मोहीम यशस्वी केल्यानंतर गोळे घराण्याला स्वराज्यात सामावून घेतले; पिलाजी गोळे स्वराज्यात दाखल झाले. त्यांचे मूळ ठिकाण आणि समाधी पिरंगुट येथे आहे. पिरंगुट येथील वाडय़ात छत्रपती शिवाजी महाराजांचा मुक्कामही झाला होता. ते स्वराज्याचे पहिले पायदळ प्रमुख होते. हिंदवी स्वराज्यात मिर्झाराजे धुमाकूळ घालत असताना स्वराज्याच्या शिलेदारांनी निकराचा लढा दिला. यात पिलाजी गोळे यांचे योगदान महत्त्वाचे होते. पुण्याजवळील पिरंगुट या गावी सरनौबत नरवीर पिलाजी गोळे यांचे समाधीस्थळ आहे. या गावात छत्रपती शिवाजी महाराज स्थापित श्री जगदिश्वराचे देखणे मंदिर आहे.