
आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या (AI) वाढत्या प्रभावामुळे जगभरातील तंत्रज्ञान क्षेत्रातील नोकऱ्यांवर टांगती तलवार आहे. आत्तापर्यंत अनेक आयटी कंपन्यांकडून हजारो कर्मचाऱ्यांची कपात केली आहे. एकाच वेळी हजारो कर्मचाऱ्यांना कामावरून काढले जात असताना अमेरिकन दिग्गज कंपनी मायक्रोसॉफ्टने एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. मायक्रोसॉफ्टने आपल्या कर्मचाऱ्यांना अचानक काढून टाकण्याऐवजी स्वेच्छानिवृत्तीचा सन्मानजनक पर्याय उपलब्ध करून दिला आहे.
मायक्रोफ्टने हिंदुस्थान, अमेरिका, ब्रिटन आणि कॅनडा या चार देशांमधील तब्बल 60 हजार कर्मचाऱ्यांसाठी स्वेच्छेने नोकरी सोडण्याचा पर्याय उपलब्ध करून दिला आहे. ज्या कर्मचाऱ्यांना स्वतःहून कंपनी सोडायची आहे, त्यांच्यासाठी हा पर्याय उपलब्ध असून कंपनी त्या बदल्यात त्यांना आर्थिक मदत आणि इतर संसाधने उपलब्ध करून देणार आहे. हिंदुस्थानात सध्या सुमारे 23 हजार कर्मचारी कार्यरत आहेत. यापैकी जर कोणाला नोकरी सोडायची असल्यास त्यांना 1 डिसेंबरपर्यंतची मुदत देण्यात आली असून कंपनीकडून त्यांना ईमेलद्वारे माहिती पाठवली जात आहे.
या योजनेअंतर्गत नोकरी सोडणाऱ्या कर्मचाऱ्यांना कंपनीकडून भरभक्कम पॅकेज दिले जाणार आहे. कंपनीतील प्रत्येक पूर्ण केलेल्या सेवा वर्षाच्या बदल्यात 1 महिन्याची बेसिक सॅलरी दिली जाईल. याशिवाय, कर्मचाऱ्यांना हेल्थ इन्शुरन्स (आरोग्य विमा) आणि नवीन नोकरी शोधण्यासाठी करिअर ट्रान्झिशन सर्व्हिसची सुविधा देखील दिली जाणार आहे.
कंपनीचे मुख्य मुख्य पीपल ऑफिसर एमी कोलमैन यांनी याबात स्पष्टीकऱण दिले आहे. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार,ही योजना सर्व ऑपरेशन्ससाठी सारखी लागू होणार नसून बिझनेसच्या प्राथमिकतेनुसार लेव्हल 70 किंवा त्याखालील ग्रेडच्या कर्मचाऱ्यांसाठीच मर्यादित आहे. जे कर्मचारी नव्या नोकरीच्या शोधात आहेत त्यांना या माध्यमातून योग्य ते सहकार्य मिळण्यास मदत होईल.

























































