
शिवसेनेचे माजी पालघर जिल्हाप्रमुख तसेच सामाजिक, सांस्कृतिक व क्रीडा क्षेत्रात भरघोस कामगिरी करणारे निष्ठावंत शिवसैनिक शिरीष चव्हाण यांचे आज अल्पशा आजाराने नालासोपारा येथे निधन झाले. ते 64 वर्षांचे होते. त्यांच्या अकाली निधनामुळे पालघर जिह्यातील लढाऊ शिवसैनिक हरपला आहे.
शिवसेनेचे पालघर जिह्यात संघटन मजबूत करण्यासाठी शिरीष चव्हाण यांनी विशेष मेहनत घेतली होती. एक अभ्यासू व आक्रमक पदाधिकारी म्हणून पालघरच्या राजकीय वर्तुळात त्यांची ओळख होती. अनेक आंदोलनांमध्येही त्यांचा सहभाग होता. शिरीष चव्हाण यांच्या पश्चात पत्नी शिल्पा, मुलगा रोहन, मुलगी धनश्री जाधव व नातवंडे असा परिवार आहे. तुळींज येथील स्मशानभूमीत शिरीष चव्हाण यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
शिरीष चव्हाण यांच्या निधनाचे वृत्त समजताच शिकसेना उपनेत्या ज्योती ठाकरे, पालघर जिल्हा माजी सहसंपर्कप्रमुख केतन पाटील, जिल्हाप्रमुख प्रथमेश राऊत, माजी आमदार हितेंद्र ठाकूर, माजी महापौर राजीक पाटील, आमदार राजन नाईक, आमदार स्नेहा दुबे, मनसे तालुकाप्रमुख प्रफुल्ल ठाकूर, माजी महापौर नारायण मानकर, महापौर अजीक पाटील, माजी स्थायी समिती सभापती संदेश जाधक आदींनी त्यांच्या पार्थिवाचे दर्शन घेतले तसेच चव्हाण यांच्या कुटुंबीयांचे सांत्वन केले.

























































