पंजाबमध्ये बर्निंग ट्रेनचा थरार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पंजाबमध्ये शुक्रवारी दुपारी धावत्या कर्मभूमी एक्प्रेसला अचानक आग लागली. इंजिनला जोडलेल्या जनरल डब्यात आग भडकली आणि पाहता पाहता ट्रेनचे चार जनरल डबे आगीच्या कचाटय़ात सापडले. सुदैवाने या घटनेत कोणतीही प्राणहानी झाली नाही. पंजाबमधून पश्चिम बंगलमधील न्यू जलपाईगुडी येथे जाणाऱ्या कर्मभूमी एक्प्रेसमध्ये पतियाळाजवळच्या सराय बंजारा रेल्वे स्थानकाजवळ ही घटना घडली. डब्यातील पंख्यात शॉर्टसर्पिट झाल्यामुळे ही घटना घडली, अशी शक्यता वर्तविण्यात आली आहे. तर काही जणांनी पॅण्ट्री कारमधून आग भडकल्याचा दावा केला आहे. आग लागली त्यावेळी ट्रेनमध्ये 1,500 पेक्षा जास्त प्रवासी होते.