HSC SSC Exams – दहावी बारावीच्या परीक्षांचे वेळापत्रक जाहीर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत फेब्रुवारी-मार्च २०२७ घेण्यात येणाऱ्या दहावी आणि बारावीच्या परीक्षांचे अंतिम वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. या वर्षी बारावीची परीक्षा ६ फेब्रुवारी रोजी सुरू होणार असून १८ मार्चपर्यंत चालणार आहे. तर दहावीची लेखी परीक्षा १५ फेब्रुवारी ते १५ मार्च या दरम्यान होणार आहे. या परिक्षांचे सविस्तर वेळापत्रक ६ डिसेंबरपासून राज्य मंडळाच्या संकेतस्थळावर टाकण्यात येणार आहे.