
उत्तर प्रदेशात कानपूर येथे घराचे छत कोसळून झालेल्या अपघातात 15 दिवसांच्या ताह्या बाळासह तिघांचा मृत्यू झाल्याची घटना घडली. पंकी पडाव भागात हे घर होते. विनोदिनी शुक्ला (68), अंशिका शुक्ला (28) आणि तान्हा आराव यांचा या घटनेत मृत्यू झाला. आज सकाळी 8.30 वाजताच्या सुमारास अचानक घराचे छत कोसळले. त्यावेळी घरातील लोक झोपेत होते. छत कोसळल्यानंतर त्यांनी मदतीसाठी आरडाओरड सुरू केली. ती ऐपून शेजारी मदतीसाठी धावले. बचाव पथकाच्या मदतीने घरात अडकलेल्यांना बाहेर काढून रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे त्यांना मृत घोषित करण्यात आले.
























































