
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त एम. एन. सिंग यांनी लिहिलेल्या ‘मुंबई – द ट स्टोरी ऑफ द 1993 सिरियल ब्लास्ट्स’ ः द ड्रीम सिटी दॅट वेंट टू वॉर विथ इटसेल्फ या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा लवकरच पार पडणार आहे. 5 डिसेंबर रोजी वरळीच्या डॉ. अॅनी बेझंट रोडवरील ‘डिस्कव्हरी ऑफ इंडिया’ इमारतीच्या ‘हॉल ऑफ कल्चर’ येथे सायंकाळी 5.30 वाजता हा प्रकाशन सोहळा पार पडणार आहे.
मुंबईत 1993 साली झालेल्या सिरीयल बॉम्ब ब्लस्टच्या थरारक घटना या पुस्तकाच्या माध्यमातून वाचकांपर्यंत पोहचवण्याचा प्रयत्न एम. एन. सिंग यांनी केला आहे. हे पुस्तक रूपा पब्लिकेशन्सने प्रकाशित केले आहे. या प्रकाशन सोहळय़ाला न्यायमूर्ती जे. एन. पटेल प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. तसेच ज्येष्ठ निवृत्त आयपीएस अधिकारी जुलिओ रिबेरो, व्ही. बालचंद्रन आणि सतीश सहानी संवाद साधणार आहेत.



























































