पत्रकार योगेश जोशी यांचे निधन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

दै. ‘सामना’ मधील ऑनलाइन विभागातील पत्रकार योगेश रवींद्र जोशी (44) यांचे मंगळवारी सायंकाळी हृदयविकाराने निधन झाले. गेल्या महिन्याभरापासून ते आजारी होते. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, आई आणि बहीण असा परिवार आहे. योगेश जोशी हे गेल्या 20 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात होते. या काळात त्यांनी प्रिंट, टीव्ही आणि ऑनलाईन माध्यमात काम केले. त्यांच्या पार्थिवावर उद्या, बुधवारी सकाळी 10 वाजता सोमवारी बाजार, मालाड येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.