
दैनिक ‘सामना’चे माजी वरिष्ठ उपसंपादक नारायण जाधव यांचे बुधवारी रात्री पावणेअकरा वाजण्याच्या सुमारास हृदयविकाराने निधन झाले. ते 65 वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी असा परिवार आहे. तीन दशकांहून अधिक काळ ते दै. ‘सामना’मध्ये कार्यरत होते. नारायण जाधव यांच्या पार्थिवावर गुरुवारी सायंकाळी आळेफाटा येथील त्यांच्या मूळ गावी अंत्यसंस्कार करण्यात आले. तत्पूर्वी त्यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी भांडूप पूर्व येथील निवासस्थानी ठेवले होते.



























































