
सामना प्रतिनिधी, मुंबई
१९९५ साली खुनाच्या गुह्यात जामीन मिळाल्यापासून पसार झालेला अरुण गवळी टोळीचा गुंड अखेर मुंबई क्राइम ब्रँचला सापडला. सुरेश उपाध्याय (४६) असे त्याचे नाव असून पोलिसांनी त्याला अटक केली आहे.
हत्येच्या गुह्यात अटक झाल्यानंतर जामिनावर बाहेर आल्यापासून पसार झालेला आणि तेव्हापासून एकदाही सुनावणीला हजर न राहिलेला आरोपी सुरेश हा मुंबईजवळच्याच परिसरात राहत असल्याची खबर युनिट-७ च्या पथकाला मिळाली होती. त्यानुसार पोलीस पथकाने शोधमोहीम राबवून सुरेशला इतक्या वर्षांनंतर अखेर अटक केली. १९९०च्या दशकात सुरेश हा अरुण गवळी टोळीसाठी काम करीत होता. ९२ ते ९५च्या दरम्यान सुरेशने भांडुप व उल्हासगनरमध्ये हत्या आणि हत्येचा प्रयत्न असे चार गुन्हे केले होते. भांडुप येथे केलेल्या हत्येच्या गुन्ह्यात सुरेशला अटक झाली होती.
























































