रत्नदुर्ग किल्ल्याच्या पायथ्याशी मृतदेह सापडलेल्या तरूणीची ओळख पटली

dead-body

रत्नागिरी शहरातील रत्नदुर्ग किल्ल्याच्या पायथ्याशी पडून एका तरूणीचा काल सोमवारी मृतदेह सापडला होता. त्या तरूणीची ओळख पटली असून ती मूळची महाडची असून शिक्षणासाठी रत्नागिरीत आली होती. त्या तरूणीचा अपघात झाला की घातपात याबाबत अद्याप स्पष्ट झालेले नाही. त्या तरूणीचे पालक रत्नागिरीत पोहोचले आहेत.

सोमवारी रत्नदुर्ग किल्ल्याच्या पायथ्याशी एका तरूणीचा मृतदेह सापडला. खडकात पडलेल्या तरूणीला गंभीर दुखापत झाली होती. मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाला होता. सायंकाळी पोलिसांनी हा मृतदेह खडकातून बाहेर काढला. त्या तरूणीची ओळख पटली असून तिचे पालक रत्नागिरीत आले आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या