दिल्लीतील मॉडेल टाऊन परिसरात एक इमारत कोसळल्याची घटना शनिवारी घडली. ढिगाऱ्याखालून तीन जणांना बाहेर काढण्यात आले असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. जखमींपैकी दोघांची प्रकृती गंभीर आहे. ढिगाऱ्याखाली अनेक जण दबल्याची शक्यता आहे. घटनेची माहिती मिळताच अग्नीशमन दल, बचाव पथक घटनास्थळी हजर झाले. घटनास्थळी बचाव कार्य सुरु आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सदर इमारत जीर्ण झाली होती. यामुळे शनिवारी मुसळधार पावसामुळे ही इमारत कोसळली. दिल्लीत गेल्या काही दिवसांपासून सतत पाऊस कोसळत आहे. पावसामुळे दिल्लीतील अनेक भागात पाणी साचले आहे. तसेच ट्रॅफिक जॅमनेही दिल्लीकर हैराण झाले आहेत.