एकेकाळचा प्रसिद्ध बालकलाकार आता राहतोय रस्त्यावर, अवस्था बघून बसेल धक्का

एकेकाळी टीव्हीवर गाजलेली भूमिका साकारून लहान मुलांच्या मनात घर करणाऱ्या एका बाल कलाकाराची सध्याची अवस्था अत्यंत दयनीय आहे. या कलाकाराची मानसिक स्थिती ठीक नसून तो सध्या रस्त्यावर राहत आहे. या कालाकाराचे नाव टेलर चेस असे असून त्याने निकलोडियन चॅनेलवर नेड्स डिक्लासिफाईड स्कूल या मालिकेत मार्टीन क्वेरलीची भूमिका केली होती. 2004 ते 2007 दरम्यान ही मालिका लहान मुलांमध्ये खूप गाजली होती.

चेस टेलर हा सध्या कॅलिफोर्नियामध्ये रस्त्यावर राहत आहे. त्याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्यात तो रस्त्यावर अगदी अस्वच्छ कपड्यांमध्ये दिसत आहे. एका तरुणाने त्याला ओळखल्यानंतर त्याचा व्हिडीओ काढला व फंड रेजिंगसाठी तो व्हिडीओ सोशल मीडियावर टाकला आहे.

दरम्यान चेसच्या आईने त्याला पैशांची गरज नसून वैद्यकीय उपचारांची गरज आहे. तो वैद्यकीय उपचार घ्यायला तयार होत नसल्याने त्याची ही अवस्था झाल्याचे सांगितले आहे.