दापोली विधानसभा मतदार संघात शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे पक्ष संघटन वाढत आहे. मिंधे गटाला लागलेल्या कार्यकर्त्यांच्या गळतीने मिंधे गट चांगलाच हतबल झाला आला आहे. त्यात आणखीन भर म्हणजे ठाणे, दिवा येथे दापोली विधानसभा मतदार संघाचा मेळावा उत्तर रत्नागिरी जिल्हा प्रमुख आणि दापोली विधानसभा मतदार संघाचे माजी आमदार संजय कदम यांच्या नेतृत्वाखाली झाला. या मेळाव्यात दापोली तालूक्यातील टेटवली पंचायत समिती गणातील मिंधे गटातील मुंबई कार्यकारणीचे सहसचिव प्रशांत कदम यांनी आपल्या सहकारी कार्यकर्त्यांसह शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षात जाहीर प्रवेश केला. त्यांच्या या पक्षप्रवेशाने मिंधे गटाला जबरदस्त धक्का बसला आहे.
या कार्यक्रमात दापोली तालूक्यातील खेर्डी विभागातील सोंडेघरचे मुकेश जाधव यांनी भाजपाला रामराम ठोकत शिवसेनेत (उद्धव बाळासाहेब ठाकरे) जाहीर प्रवेश केला. अशाप्रकारे सातत्याने होणाऱ्या पक्ष प्रवेशाने दापोली मतदार संघात शिवसेनेची ताकद वाढत आहे. माजी आमदार संजय कदम यांच्या नेतृत्वाखाली दापोली विधानसभा मतदार संघात शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने पुन्हा एकदा मजबुत स्थितीत उभारी घेतली आहे.
या वेळी विधानसभा संपर्क प्रमुख सचिन पाटील,दापोली विधानसभा सहसंपर्क प्रमुख प्रवीण लाड, दापोली तालूका संपर्क प्रमुख रविंद्र धाडवे, सहसंपर्क प्रमुख अजित शिर्के, दापोली तालुका प्रमुख ऋषिकेश गुजर,मंडणगड तालुका प्रमुख संतोष गोवळे मंडणगड संपर्क प्रमुख महेश गणवे सहसंपर्क प्रमुख रघुनाथ धनावडे, विजय भुवड, गणेश दंवडे, सुरेश शिगवण, सुहास कान्हाल, राजेश इंदुलकर, अंनत पाटील, सुनिल जाधव,युवासेना उपजिल्हा अधिकारी गणेश बिल्लार आदी शिवसेना पदाधिकारी उपस्थितीत होते.