मंत्रालयाबाहेर आत्मदहनाचा प्रयत्न

मंत्रालयात सोलापूरमधील एका महिलेने सकाळी गार्डन गेटच्या बाहेर अंगावर रॉकेल टाकून आत्मदहनाचा प्रयत्न केला. सोलापूरमधील पांगरी पोलीस ठाण्यामध्ये केलेल्या तक्रारीची दखल घेतली जात नसल्यामुळे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी ही महिला मुंबईत आली आणि तिने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी या महिलेला ताब्यात घेऊन पुढील उपचारांसाठी शासकीय रुग्णालयात दाखल केले आहे.