
आधार कार्डमध्ये काही अपडेट करायचे असेल तर 14 जून 2025 पर्यंत फ्रीमध्ये करता येऊ शकते. आधारमधील नाव, जन्मतारीख, पत्ता बदलायचा असेल तर फ्रीमध्ये करण्याची सुविधा युनिक आयडेंटिफिक्शन अथॉरिटी ऑफ इंडिया (यूआयडीएआय) च्या वेबसाईटवर देण्यात आली आहे. 14 जूननंतर बदल करायचा असल्यास यासाठी 50 ते 100 रुपये भरावे लागू शकतात. मायआधार वेबसाईटवर यासंबंधी सविस्तर माहिती देण्यात आली आहे. पत्ता बदलण्यासाठी पीडीएफ पुरावा जोडणे आवश्यक आहे.