पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे कोरोना पॉझिटिव्ह

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

शिवसेना नेते, युवासेनाप्रमुख व राज्याचे पर्यटन व पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांना कोरोनाची लागण झाली आहे. आदित्य ठाकरे यांनी ट्विटरवरून याची माहिती दिली आहे. आपल्या संपर्कात आलेल्या व्यक्तींनी स्वतःची चाचणी करून घ्यावी आणि काळजी घ्यावी असे आवाहनही त्यांनी केले आहे.

‘कोरोनाची लक्षणे जाणवू लागल्याने मी कोविड चाचणी करून घेतली. ती पॉझिटिव्ह आली आहे. कोरोना संसर्ग टाळण्यासाठी कायम मास्क घाला, कोविड नियमावलीचे पालन करा तसेच आपली व आपल्या कुटुंबीयांची काळजी घ्या’, अशी विनंतीही आदित्य ठाकरे यांनी सर्वांना केली आहे.