
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते, युवासेना प्रमुख आमदार आदित्य ठाकरे यांनी बुधवारी म्हाडाचे अध्यक्ष संजीव जयस्वाल यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी बीडीडी चाळवासियांना दरमहा 40 हजार घरभाडे द्या, अशी विनंती करणारे पत्र जयस्वाल यांना दिले.
ना. म. जोशी मार्ग, वरळी व नायगाव येथील बी.डी.डी. चाळ पुनर्विकासांतर्गत स्थलांतरित रहिवाशांना सध्या मिळणारे रु. २५,००० घरभाडे वाढत्या महागाईमुळे अपुरे ठरत आहे. त्यामुळे दरमहा किमान रु. ४०,००० घरभाडे मंजूर करण्याची विनंती म्हाडाचे अध्यक्ष संजीव जयस्वाल ह्यांना पत्राद्वारे केली. pic.twitter.com/fPMhfYrzen
— Aaditya Thackeray (@AUThackeray) April 8, 2026
याबाबत आदित्य ठाकरे यांनी X वर फोटो पोस्ट करत माहिती दिली आहे. ”ना. म. जोशी मार्ग, वरळी व नायगाव येथील बी.डी.डी. चाळ पुनर्विकासांतर्गत स्थलांतरित रहिवाशांना सध्या मिळणारे रु. २५,००० घरभाडे वाढत्या महागाईमुळे अपुरे ठरत आहे. त्यामुळे दरमहा किमान रु. ४०,००० घरभाडे मंजूर करण्याची विनंती म्हाडाचे अध्यक्ष संजीव जयस्वाल ह्यांना पत्राद्वारे केली”, असे आदित्य ठाकरे यांनी ट्विट केले आहे.

























































