पश्चिम उपनगरातील महिलांसाठी अत्याधुनिक आरोग्यसुविधा, आदित्य ठाकरे यांच्या हस्ते

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मुंबई महापालिकेच्या दहिसरमधील रावळपाडा येथील एनआयसीयू युनिटसह ऑपरेशन थिएटर आणि इतर सुविधांनी सुसज्ज अशा अत्याधुनिक प्रसूतीगृहाचे उद्घाटन पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांच्या हस्ते झाले. त्यामुळे पश्चिम उपनगरातील महिलांना अत्यंत माफक दरात अत्याधुनिक आरोग्यसुविधा उपलब्ध होणार आहेत. नगरसेवक संजय घाडी यांनी महापालिकेकडे पाठपुरावा केला होता.

पश्चिम उपनगरात प्रभाग क्रमांक 5 मधील शिवसेनेकडून विविध विकासकामे सुरू असून यात रावळपाडा येथील महापालिकेच्या प्रसूतीगृहाचे नूतनीकरण करण्यात आले. नगरसेवक संजय घाडी आणि माजी नगरसेविका संजना घाडी प्रभागात विकासाची अनेक कामे करत आहेत. नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी प्रयत्नशील असतात. विकासकामांसाठी आवश्यक ती सगळी मदत केली जाईल, असे आदित्य ठाकरे म्हणाले.

नगरसेवक संजय घाडी यांच्या कार्य अहवालाचे प्रकाशन आदित्य ठाकरे यांच्या हस्ते झाले. यावेळी शिवसेना उपनेते, मुंबई इमारत दुरुस्ती मंडळाचे सभापती विनोद घोसाळकर, विभागप्रमुख, आमदार विलास पोतनीस, आमदार प्रकाश सुर्वे, शिवसेना प्रवक्त्या संजना घाडी, माजी आमदार हेमेंद्र मेहता, महिला विभाग संघटक सुजाता शिंगाडे, प्रभाग समिती अध्यक्षा सुजाता पाटेकर, उपायुक्त डॉ. भाग्यश्री कापसे, सहाय्यक आयुक्त मृदुला अंडे, आरोग्य अधिकारी डॉ. अविनाश वायदांडे, नगरसेविका रिध्दी खुरसंगे, माजी नगरसेवक उदेश पाटेकर, अशोक नगर, भास्कर खुरसुंगे,विकासक नेमचंदभाई देडिया, राज सुर्वे, उपविभाग संघटक मीना पानमंद, माथाडी कामगार नेते अरुण पवार, शाखाप्रमुख सचिन शिर्पे, महिला शाखासंघटक विद्या पोतदार, संजय ढोले युवासेना शाखा धिकारी दिलीप परब आदी उपस्थित होते.