छत्रपती संभाजीनगरातआज मशाल रॅली! आदित्य ठाकरे करणार नेतृत्व

महापालिका निवडणुकांची रणधुमाळी सुरू झाली असून छत्रपती संभाजीनगरात शिवसेनेच्या प्रचाराचा शुभारंभ उद्या संस्थान गणपती मंदिरात श्रीफळ वाढवून केला जाणार आहे. त्यानंतर शहरात भव्य मशाल रॅली काढण्यात येणार आहे. शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे या

रॅलीचे नेतृत्व करणार आहेत.

मशाल रॅलीची सुरुवात क्रांती चौक येथून सायंकाळी सहा वाजता होणार असून पैठणगेटमार्गे ही रॅली गुलमंडी येथे पोहचेल. तिथे जाहीर सभेने रॅलीची सांगता होणार आहे. या रॅलीचे नेतृत्व आदित्य ठाकरे करणार असून शिवसैनिकांमध्ये जबरदस्त उत्साह आणि चैतन्य पसरले आहे. या रॅलीची जय्यत तयारी करण्यात आली आहे.

तपोवनाला देणार भेट

नाशिकच्या तपोवनातील वृक्षतोडीला पर्यावणप्रेमी आणि नाशिककरांनी कडाडून विरोध केला आहे. शिवसेना या मुद्दय़ावर नाशिककरांच्या सोबत उभी ठाकली आहे. या पार्श्वभूमीवर आदित्य ठाकरे उद्या नाशिकमध्ये येत आहेत. ते सकाळी 11 वाजता तपोवनाला भेट देऊन पाहणी करणार आहेत. दुपारी 12 वाजता नाशिक शहरातील शिवसेना पदाधिकाऱयांचा मेळावा देवळाली येथे होणार आहे. त्या मेळाव्याला आदित्य ठाकरे उपस्थित राहणार आहेत.