
हिंदुस्थान-अमेरिकेतील मुक्त व्यापार करारावरून शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी मोदी सरकारला लक्ष्य केले. ‘‘मोदी सरकारने कराराचे सत्य काय आहे ते देशाला सांगावे,’’ अशी आग्रही मागणी आदित्य ठाकरे यांनी केली.
आदित्य ठाकरे यांनी ‘एक्स’ पोस्टच्या माध्यमातून यावर प्रतिक्रिया दिली आहे. ‘‘भाजपचे सरकार विरोधी पक्ष, अभिव्यक्ती स्वातंत्र्य, स्वतंत्र पत्रकारिता, पर्यावरणवाद्यांच्या विरोधात कारवाया करताना अत्यंत कठोर असते. मात्र देशाचे सार्वभौमत्व जपण्याच्या, व्यापार करारावर वाटाघाटी करण्याच्या, जागतिक राजकारण आणि राष्ट्रीय हितावर मुत्सद्दी भूमिका घेण्याच्या बाबतीत कमपुवत होते,’’ असे आदित्य ठाकरे यांनी सुनावले. ‘‘अमेरिकेशी झालेल्या कराराबाबत सरकारने स्पष्टता आणावी. त्यासाठी पत्रकार परिषद घ्यावी आणि आधीच ठरवलेल्या प्रश्नांऐवजी खऱया प्रश्नांची उत्तरे द्यावीत,’’ असा टोलाही त्यांनी हाणला.
हिंदुस्थानच्या सुरक्षेविषयी पाकिस्तानी संसदेत प्रश्न विचारायचा का?
चिनी घुसखोरीवर राहुल गांधी यांना लोकसभेत बोलू दिले जात नसल्यावरून आदित्य ठाकरे यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. ‘‘हिंदुस्थानच्या राष्ट्रीय सुरक्षेविषयी पाकिस्तानच्या संसदेत प्रश्न विचारायचा का?’’ असा सवाल त्यांनी केला. ‘‘ज्यांच्या पुस्तकाचा आधार घेऊन राहुल गांधी बोलत आहेत, त्यांना लष्करप्रमुख याच सरकारने बनवले होते. त्यांनी लिहिलेले ऐपून घ्यायला यांना भीती का वाटते? हिंदुस्थानातील लोकशाही संपली हे सरकारने एकदा जगाला जाहीरपणे सांगितले पाहिजे,’’ असे आदित्य ठाकरे म्हणाले.



























































