उद्योग व पर्यावरणाचा समतोल साधत माहुलमधील प्रदूषण नियंत्रण करा, आदित्य ठाकरे यांचे आदेश

माहुल येथील प्रदूषण नियंत्रणासाठी राष्ट्रीय हरित लवादाने दिलेल्या सूचनांचे पालन करत या भागातील उद्योग आणि पर्यावरणाचा समतोल साधून परिसरातील प्रदूषण नियंत्रण करावे, असे आदेश पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी दिले.

माहुलमधील प्रदूषणाच्या समस्येबाबत आदित्य ठाकरे यांनी गुरुवारी बैठक आयोजित केली होती. माहुलमधील प्रदूषणाची वाढती समस्या कमी करण्यासाठी तेथील उद्योगांनी राष्ट्रीय हरित लवादाने दिलेल्या सूचनांचे तंतोतंत पालन करावे. माहुलमधील उद्योगांनी पर्यावरण रक्षणासाठी निकषांची पूर्तता पुढील काही दिवसांत करावी. त्यासाठी राष्ट्रीय हरित लवाद यांनी सूचना दिलेल्या आहेत. सांडपाणी व्यवस्थापन, ग्रीन झोनची निर्मिती, हवेचे प्रदूषण कमी करण्यासाठी उपाययोजना करावी, असे आदित्य ठाकरे म्हणाले.

प्रदूषण नियंत्रणासाठीच्या विविध आवश्यक उपाययोजना राबवून माहुलमधील प्रदूषण नियंत्रित करूया. उद्योग आवश्यक आहेतच, पण त्याबरोबर पर्यावरणाचे रक्षणही आवश्यक आहे, असे पर्यावरण राज्यमंत्री संजय बनसोडे म्हणाले.

आपली प्रतिक्रिया द्या