
जम्मू कश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांचे मंगळवारी निधन झाले. गेल्या काही दिवसांपासून ते आजारी होते. दिल्लीतील राम मनोहर लोहिया रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
जम्मू काश्मिरचे माजी राज्यपाल आणि ज्येष्ठ नेते सत्यपाल मलिक जी ह्यांच्या निधनाचं वृत्त दुःखद आहे.
सत्यपाल मलिक ह्यांनी कुठलीही भीती न बाळगता नेहमी सत्याची बाजू मांडली, वेळप्रसंगी रोषही पत्करला, पण ते मागे हटले नाहीत.
संघर्षमय कारकीर्दीच्या ह्या लढवय्या नेत्याला भावपूर्ण…
— Aaditya Thackeray (@AUThackeray) August 5, 2025
त्यांच्या निधनावर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते, युवासेनाप्रमुख, आमदार आदित्य ठाकरे यांनी श्रद्धांजली वाहिली आहे. ”जम्मू काश्मीरचे माजी राज्यपाल आणि ज्येष्ठ नेते सत्यपाल मलिक जी यांच्या निधनाचं वृत्त दुःखद आहे. सत्यपाल मलिक यांनी कुठलीही भीती न बाळगता नेहमी सत्याची बाजू मांडली, वेळप्रसंगी रोषही पत्करला, पण ते मागे हटले नाहीत. संघर्षमय कारकीर्दीच्या या लढवय्या नेत्याला भावपूर्ण श्रद्धांजली”, अशा शब्दात आदित्य ठाकरे यांनी ट्विटरवरून श्रद्धांजली वाहिली आहे.