क्लायमेट अॅक्शन प्लॅन तयार करणार; पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांची माहिती

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

बदलत्या वातावरणामुळे राज्यातील परिस्थिती बदलली आहे. त्यामुळे सर्व शहरासाठी क्लायमेंट अॅक्शन प्लॅन तयार करण्यात येणार असल्याची माहिती राज्याचे पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी दिली.

संभाजीनगर विभागीय आयुक्त कार्यालयात बुधवारी पर्यटन आणि पर्यावरणासंदर्भात आढावा बैठक घेतल्यानंतर पर्यटन, पर्यावरण, वातावरणीय बदल आणि राजशिष्टाचारमंत्री आदित्य ठाकरे यांनी पत्रकाराशी संवाद साधला. दोन वर्षांपूर्वी राज्यातील ज्या दुष्काळी भागात सरकार मदत देत असे, तिथे आता आता गारपीट होत आहे. वातावरणीय बदलामुळे एकूणच राज्यातील परिथिती बदलत आहे. त्यामुळे सर्व शहरासाठी क्लायमेंट अॅक्शन प्लॅन तयार करण्याबाबत प्रक्रिया सुरु करण्यात येणार आहे, अशी माहिती त्यांनी दिली.

खास पर्यटकांसाठी सुरु करण्यात आलेल्या डेक्कन ओडिसीतून सर्वसामान्य पर्यटकलाही प्रवास करता येईल, यासाठी तशी तरतूद केली जाईल, असे ते म्हणाले. ई व्हेईकलसाठी सौर ऊर्जेचा वापर व्हावा, असा आपला नेहमीच आग्रह असतो. ही वीज निर्माण करण्यासाठी मुंबई -नागपूर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे समुद्धी मागावर 250 मेगावॅट ऊर्जानिर्मितीसाठी सौर ऊर्जा प्रकल्प सुरु केला जाणार आहे, असेही त्यांनी सांगितले.