
वरळीमध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आयोजित ‘करून दाखवलंय ते अभिमानाने सांगूया’ हा मुंबईतील पदाधिकाऱ्यांचा भव्य मेळावा उत्साहात पार पडला. यावेळी शिवसेना नेते, युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी शिवसेनेच्या सत्ताकाळात झालेल्या विकासकामांचे प्रेझेंटेशनच सादर केले. या मेळाव्यात शिवसेनेने केलेल्या बीडीडी चाळींचा पुनर्विकास, कोस्टल रोड, डिजिटल शाळा, पूरमुक्त हिंदमातासह मुंबईतील असंख्य विकासकामांची यादीच त्यांनी मुंबईकरांसमोर ठेवली. या मेळाव्य़ाला शिवसैनिकांचा उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला. त्यामुळे मुंबईच्या, मुंबईकरांच्या हिताचं जे काही कार्य केलं ते सांगताना मला खरंच अभिमान वाटला, अशा शब्दात आदित्य ठाकरे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
वरळी येथील NSCI Dome येथे पार पडलेल्या मुंबईतील पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्यात २५ वर्षांच्या इतिहासात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने मुंबईच्या, मुंबईकरांच्या हिताचं जे काही कार्य केलं ते सांगताना मला खरंच अभिमान वाटला.
होय, मी अभिमानाने सांगतो…
आम्ही करून दाखवलं!मुंबई…
— Aaditya Thackeray (@AUThackeray) December 19, 2025
आदित्य ठाकरे यांनी ट्वीट करत होय, मी अभिमानाने सांगतो…आम्ही करून दाखवलं! या घोषणेचा पुनरुच्चार केला. वरळी येथील NSCI Dome येथे पार पडलेल्या मुंबईतील पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्यात 25 वर्षांच्या इतिहासात शिवसेनेने मुंबईच्या, मुंबईकरांच्या हिताचं जे काही कार्य केलं ते सांगताना मला खरंच अभिमान वाटला, असे ते म्हणाले.
दरम्यान आगामी निव़डणुकांच्या पार्श्वभूमीवर एकत्र .येऊन मुंबई वाचवण्याचे आवाहन आदित्य ठाकरे यांनी जनतेला केले. मुंबई आपली आहे! तिच्यासाठी मुंबईकर म्हणून एकवटूया, आपली मुंबई वाचवूया! असे ते यावेळी म्हणाले.




























































