भाजप व काँग्रेस हे राष्ट्रीय पक्ष युती करतायत की काय असा प्रश्न पडलाय – आदित्य ठाकरे

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सत्तेसाठी अनेक पक्ष फोडणाऱ्या भाजपचाच एक गट महापौरपदाच्या निवडणुकीत काँग्रेसचा ‘हात’ हातात घेण्याची शक्यता असून त्यामुळे भिवंडीच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. यावर बोलताना आदित्य ठाकरे यांनी ”भाजप व काँग्रेस हे दोन राष्ट्रीय पक्षच युती करतायत का असा प्रश्न पडलाय”, अशी मिश्कील प्रतिक्रीया दिली.

भिवंडी महापालिकेबाबत पत्रकारांनी आदित्य ठाकरे यांना विचारले असता ते म्हणाले की, ”भिवंडीत भाजप व काँग्रेस एकत्र आले आहेत असं ऐकलं. भाजपने सत्तेसाठी बऱ्याच ठिकाणी एमआयम व काँग्रेसला आपल्या सोबत घेतले आहे. त्यामुळे आता काँग्रेस व भाजप हे दोन राष्ट्रीय पक्ष एकमेकांसोबत युती करतायत हा प्रश्न पडलाय”. असे आदित्य ठाकरे म्हणाले.

राज्यसभेच्या निवडणूकीबद्दल बोलताना आदित्य ठाकरे यांनी संख्याबळ व रोटेशननुसार या सीट शिवसेनेच्या असल्याचे सांगितले आहे. मात्र यावेळी त्यांनी याबाबत महाविकास आघाडीसोबत अधिकृत चर्चा होईल, असे सांगितले.