
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे मित्र डोनाल्ड ट्रम्प यांनी हिंदुस्थानवर 50 टक्के टॅरिफ लादला आहे. यावरून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, युवासेनाप्रमुख, आमदार आदित्य ठाकरे यांनी केंद्रातील मोदी सरकारवर हल्ला चढवला आहे. ‘तारीफ’पासून ‘टॅरिफ’पर्यंतचा प्रवास आता 50 टक्क्यांपर्यंत पोहोचलाय, असा घणाघात आदित्य ठाकरे यांनी केला.
आदित्य ठाकरे यांनी गुरुवारी दुपारी एक्स (आधीचे ट्विटर) वर ट्विट शेअर करत मोदी सरकारच्या परराष्ट्र धोरणावर सडकून टीका केली. ते म्हणाले की, बांगलादेशमधील हिंदूंवर हल्ले होत आहेत आणि बीसीसीआयनेच बांगलादेशला भारतात द्विपक्षीय क्रिकेट स्पर्धेसाठी आमंत्रित केलं. ते म्हणाले की, पहलगाम हल्ल्यामागे पाकिस्तान आहे! जगाला हेच सांगण्यासाठी खासदार जगभर पाठवले आणि आता बीसीसीआय पाकिस्तानसोबत क्रिकेट खेळत आहे. गेल्यावर्षी बीसीसीआय अधिकारी पाकिस्तानी क्रिकेटपटूंसोबत पार्टी करत होते.
ते म्हणाले, चीनवर बहिष्कार टाका, चिनी वस्तू वापरू नका. चीनला “लाल आँख” दाखवतो असंही त्यांनी म्हटलं. मग आता चीन दौरा कशासाठी? गलवान घडलं की नाही? त्यांनी आपल्या हद्दीत अतिक्रमण केलं की नाही? असा सवालही आदित्य ठाकरे यांनी केला.
ते म्हणाले, MAGA + MIGA = MEGA. पण ‘तारीफ’पासून ‘टॅरिफ’पर्यंतचा प्रवास आता 50 टक्क्यांपर्यंत पर्यंत पोहोचलाय. भारतीय विद्यार्थ्यांना फटका बसतोय, उद्योग आणि लघुउद्योग अडचणीत आहेत पण केंद्र सरकारमधील कोणताही मंत्री या विषयावर बोलत नाहीय, व्यापार करारावरही कोणतीच स्पष्टता नाहीय. आपल्या देशाचं परराष्ट्र धोरण विदेश दौरे काढण्यापुरतेच आहे का? असा सवालही आदित्य ठाकरे यांनी केला.
• ते म्हणाले की, बांगलादेशमधील हिंदूंवर हल्ले होत आहेत आणि @BCCI नेच बांगलादेशला भारतात द्विपक्षीय क्रिकेट स्पर्धेसाठी आमंत्रित केलं.
• ते म्हणाले की, पहलगाम हल्ल्यामागे पाकिस्तान आहे! जगाला हेच सांगण्यासाठी खासदार जगभर पाठवले आणि आता @BCCI पाकिस्तानसोबत क्रिकेट खेळत आहे.…
— Aaditya Thackeray (@AUThackeray) August 7, 2025