
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, युवासेनाप्रमुख आणि आमदार आदित्य ठाकरे यांनी शनिवारी नाशिकमधील तपोवन येथे भेट देऊन पर्यावरण प्रेमी, स्थानिकांशी संवाद साधला. तसेच ‘जागरूक नाशिककर नागरिक’ व इतर पर्यावरणप्रेमी संघटना, स्थानिकांनी दिलेले निवेदन स्वीकारले. पावनभूमी तपोवन नष्ट करून ते विकासकांच्या घशात घालण्याचे महायुतीचे मनसुबे आपल्याला उधळून टाकावेच लागतील. त्यासाठी आता एकजुटीने लढूया, असा एल्गार त्यावेळी त्यांनी उपस्थितांसमोर केला. निसर्ग रक्षणाच्या या लढ्यात शिवसेना (उद्धव बाळसाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे कायम आपल्यासोबत आहे, असे आश्वासनही त्यांनी दिले. ही वेळ फक्त आंदोलनाची नाहीय, तर कृतीतून निसर्गावर डोळा ठेवून जंगल भकास करणाऱ्या वृत्तीला हुसकावून लावण्याची आहे.






























































