हे सगळं अत्यंत घृणास्पद आहे, आदित्य ठाकरे यांनी PVR Cinemas ला फटकारले

आशिया कपचा अंतिम सामना रविवारी 28 सप्टेंबर 2025 ला टीम इंडिया व पाकिस्तानमध्ये खेळवला जाणार आहे. PVR Cinemas मध्ये हा सामना मोठ्या पडद्यावर लाईव्ह दाखवला जाणार आहे. तशी जाहिरात या कंपनीने काढली आहे.त्यावरून शिवसेना (उद्धव बाळासाहेब पवार) यांनी PVR Cinemas ला फटकारले आहे.

”हे सगळं पाहणं अत्यंत घृणास्पद आहे.तुम्ही हिंदुस्थानात काम करत असताना, कृपया हे विसरू नका की पहलगाम हल्ल्याच्या जखमा अजूनही ताज्या आहेत.दहशतवादी हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या सर्वांचा आणि त्याहूनही अधिक म्हणजे ऑपरेशन सिंदूर चालवणाऱ्या आपल्या शूर सशस्त्र दलांचा हा अपमान आहे, ज्यांपैकी काहींनी आपल्या राष्ट्रासाठी सर्वोच्च बलिदान दिले आहे”असे आदित्य ठाकरे यांनी ट्विट केले आहे.

आशिया कप सुरू झाला तेव्हापासून पाकिस्तानसोबत खेळण्याला देशभरातून विरोध होत आहे. मात्र बीसीसीआने मात्र हा विरोध न जुमानता पाकिस्तानसोबत क्रिकेटचे सामने खेळण्याला हिरवा कंदिल दिला. आशिया कपमध्ये टीम इंडिया व पाकिस्तानमध्ये दोन सामने झाले असून दोन्ही सामन्यात टीम इंडियाने पाकिस्तानला हरवले आहे.