
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, युवासेना प्रमुख, आमदार आदित्य ठाकरे यांनी आज विधानभवनाबाहेर प्रसारमाध्यमांशी बोलताना राज्य सरकारवर घणाघात केला. ”देशात हुकुमशाही आलेली आहे. मणिपूर हरयाणावर चर्चा होत नाही. विधानभवनातही आम्ही अनेक प्रश्न होत नाही. गद्दारां गँगमधील जे मंत्री बनवले आहेत. ते प्रश्न विचारला की त्यांच्याकडे उत्तराची तयारी नसते. अभ्यास कच्चा आहे यांचा. मग आम्ही यांची पोरं आहोत त्यांची पोरं आहोत. सुरू होतं. कुठचेही मंत्री अभ्यास करून य़ेत नाही हे महाराष्ट्रासाठी दुर्दैवी आहे”, अशी टीका आदित्य ठाकरे यांनी केली आहे.
यावेळी त्यांनी उद्योग मंत्र्यांनी अधिवेशनात सादर केलेल्या श्वेतपत्रिकेवरून देखील टीका केली. ” उद्योग मंत्र्यांनी श्वेतपत्रिका मांडली. तो व्हाईट पेपर आहे की वाईट पेपर, काळा पेपर आहे तेच कुणाला कळत नाहीए. कारण जर आपण परिस्थिती पाहिली की त्या श्वेत पत्रिकेत जी क्रोनोलॉजी दिली आहे. त्यात उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते तेव्हा जी कामे झाली ते लिहलेलं आहे. मविआच्या काळात किती बैठका झाल्या, किती कामं झाली, कुठल्या जागा दाखवल्या, काय ऑफर करू शकत होतो ते त्यांच्याच श्वेतपत्रिकेत लिहलेलं आहे. त्यानंतर जेव्हा सरकार बदललं घटनाबाह्य मुख्यमंत्री व वेंदांता फॉक्सकॉनवाल्यांची भेट झाली. त्या भेटीत ठरलं असेल की हा प्रोजक्ट गुजरातला पळवायचा. जसं वेदांता फॉक्सकॉनचा आहे, बल्क ड्रग, एअर बस टाटा, पण मेड़िकल डिव्हाईसचा उल्लेख नाही. प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या ठिकाणी या घटनाबाह्य सरकारमधील मंत्र्यांनी सांगितलं की हे प्रकल्प आम्ही आणत आहोत, पण उद्योग महाराष्ट्रात आले नाही. एकंदरीत महाराष्ट्रात जी राजकीय अस्थिरता निर्माण झाली आहे. जो चिखल झाला आहे. त्यामुळे उद्योजकांना महाराष्ट्रात यायचं नाहीए. ते प्रकल्प गुजरातमध्ये जाणं म्हणजे 40 गद्दारांना गुजरातमध्ये लपवले याची भेट असेल किंवा महाराष्ट्रातील अस्थिरता असेल म्हणून हे प्रकल्प गुजरातला गेले आहेत. फक्त प्रकल्पच काय वर्ल्ड कपची फायनल देखील गुजरातला होत आहे. ती खरंतर क्रिकेटची पंढरी असलेल्या वानखेडे स्टेडियमवर व्हायला हवी होती. अशो लोकांनी मविआवर टीका करणं चुक आहे. आम्ही अशा अकार्यक्षम मुख्यमंत्री व मंत्र्यांना कॅबिनेटमध्ये स्थान दिलं नसतं. हे आपलं दुर्दैवं आहे की अशी लोकं आपल्या महाराष्ट्रात आहेत”, अशी टीका आदित्य ठाकरे यांनी केली आहे.
यावेळी त्यांनी नितेश राणे यांनी मातोश्रीवर केलेल्या टीकेचाही समाचार घेतला, ”नितेश राणेंना मी किंमत देत नाही. जर असं काही दुसऱ्या देशातून येत असेल तर ते आपल्या देशाच्या सैन्यावर ते संशय घेत आहेत त्याच्यावर माझा आक्षेप आहे. जर आपल्या देशाची सीमा एवढी पोकळ असेल असं यांचं म्हणनं असेल तरच असं होऊ शकते. हे जे आरोप करत आहेत, घाणेरड्या पद्धतीचं राजकारण करतायत, केंद्रीय यंत्रणा वापरतायत. त्यांना आपला दश पाकिस्तान बनवायचाय. त्यांना आम्ही तसं करू देणार नाही. आम्ही इंड़िया आहोत. आम्ही हिंदुस्थान आहोत. भारत आहोत”, असे आदित्य ठाकरे म्हणाले.
यावेळी त्यांनी राहुल गांधी यांनी मिळालेल्या दिलास्यावर देखील भाष्य केलं. ”राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा असो किंवा संसदेतील त्यांची भाषणं भाजपला हलवून ठेवत होती. येत्या निवडणूकीत मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगढ असेल या सर्व राज्यात काँग्रेस विजयी होणार आहे. बहुमत प्राप्त होणार आहे. या भीतीमुळे हा कट निर्माण केला असेल. पण आज जो दिलासा मिळालाय त्यामुळे लोकशाहीला कुठेतरी आशा मिळाली आहे.” असे आदित्य ठाकरे म्हणाले..




























































