Operation Sindoor जय हिंद! दहशतवादाला असे ठेचा की ते पुन्हा डोके वर काढू शकणार नाहीत – आदित्य ठाकरे

जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा हिंदुस्थानी सैन्याने बदला घेतला आहे. ‘ऑपरेशन सिंदूर’ सुरू करून हिंदुस्थानी हवाई दलाने पाकिस्तान आणि पीओकेमध्ये असलेल्या 9 दहशतवादी तळांवर हवाई हल्ले केले आहेत. रात्री 1.30 च्या सुमारास ही कारवाई करण्यात आली. यावर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते, आमदार,युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

”दहशतवाद तो कोणत्याही प्रकारचा असला तरी तो संपवलाच पाहिजे. पाकिस्तान व पाकव्याप्त काश्मीरमध्ये हिंदुस्थानी संरक्षण दलाने केलेल्या एअर स्ट्राईक केला. दहशतवादाला आश्रय देणाऱ्या ठिकाणांवर अचूक हल्ले केल्याबद्दल मी हिंदुस्थानी संरक्षण दलाचे अभिनंदन करतो. दहशतवाद्यांना असे मारा की पुन्हा ते उभे राहू शकणार नाहीत, जय हिंद!, अशी प्रतिक्रिया आदित्य ठाकरे यांनी दिली.