
हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त शिवसेना–युवासेना शाखा क्र. 198 च्या वतीने भव्य रोजगार मेळावा आयोजित करण्यात आला आहे. हा मेळावा उद्या, शनिवारी सकाळी 10 ते सायंकाळी 4 या वेळेत ना. म. जोशी मार्ग शाळा, डिलाईल रोड येथे होणार आहे. शिवसेना नेते, युवासेना प्रमुख, आमदार आदित्य ठाकरे यांच्या हस्ते या मेळाव्याचे उद्घाटन होणार आहे.
विविध नामांकित कंपन्यांचा मेळाव्यात सहभागी होणार असून तब्बल 10 हजार 122 तरुणांना नोकरीची संधी उपलब्ध होणार आहे. शिवसेना-युवासेना शाखा क्र. 198 यांच्या वतीने गरजू युवक – युवतींसाठी भव्य आणि मोफत रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.
दहावी, बारावी पास, पदवीधर तसेच पदव्युत्तर उमेदवारांना या मेळाव्यात सहभागी होता येणार असून फ्रेशर्स आणि अनुभवी उमेदवारांसाठी ही मोठी संधी आहे. या उपक्रमाचे आयोजन युवासेना सहसचिव प्रथमेश बोभाटे आणि शाखाधिकारी नितीन शिरोडकर यांच्या पुढाकारातून करण्यात आले आहे. ‘प्रत्येक घरात रोजगार’ हा संकल्प डोळय़ासमोर ठेवून हा उपक्रम राबविण्यात येत असल्याचे आयोजकांनी सांगितले.
– बेरोजगार तरुणांना रोजगाराची थेट संधी उपलब्ध करून देणारा हा उपक्रम ठरणार आहे. एफएमसीजी, टेलिकॉम, हॉस्पिटॅलिटी, बीपीओ, लॉजिस्टिक्स आदी क्षेत्रांतील शेकडो नोकरीच्या संधी यावेळी उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत.
सर्व गरजू युवक-युवतींनी या सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे. सहभागी होण्यासाठी क्यूआर कोडद्वारे नोंदणी करण्याचे आवाहनही आयोजकांकडून करण्यात आले आहे.
































































