चला, मुंबईकरांची ताकद दाखवूया!

गोरेगाव, वॉर्ड क्र. 54 येथे उमेदवार अंकित प्रभू यांच्या प्रचार कार्यालयाला शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी भेट दिली. यावेळी नव्या ध्येयाची मशाल घेऊन, एक युवा नेतृत्व विकासाच्या वाटेवर निघालंय, अशा शुभेच्छा देत चला मुंबईकरांची ताकद दाखवूया, असे आवाहन त्यांनी शिवसैनिकांना केले. यावेळी शिवसेना नेते सुभाष देसाई, आमदार सुनील प्रभू उपस्थित होते. गोरेगाव येथील वॉर्ड क्र. 53 चे उमेदवार जितेंद्र वळवी, जोगेश्वरीच्या वॉर्ड क्र. 73च्या उमेदवार लोना रावत, वॉर्ड क्र. 56 च्या उमेदवार लक्ष्मी भाटिया यांच्या कार्यालयांना तसेच तेथील शाखांना आदित्य ठाकरे यांनी भेट दिली. यावेळी शिवसैनिक आणि स्थानिक नागरिकांची मोठी गर्दी उसळली. वांद्रे येथील वॉर्ड क्र. 101 च्या उमेदवार अक्षता टंडन मेनेझेस यांच्या प्रचार कार्यालयाचे उद्घाटन आदित्य ठाकरे यांनी केले. यावेळी शिवसेना नेते आमदार अॅड. अनिल परब उपस्थित होते. संतोषनगर येथील वॉर्ड क्र. 102 चे उमेदवार अनंत हजारे, शीव-वांद्रे लिंक रोड वॉर्ड क्र. 183 च्या उमेदवार पारुबाई कटके, खाबादेवी-धारावी येथील वॉर्ड क्र. 184 च्या उमेदवार वर्षा नकाशे, धारावी-कोळीवाडा वॉर्ड क्र. 187 चे उमेदवार जोसेफ कोळी यांच्या कार्यालयांनाही आदित्य ठाकरे यांनी भेटी दिल्या.