‘आप’ नेते संजय सिंह यांचा जामीन फेटाळला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
sanjay-singh-aap

दिल्लीतील कथित दारू घोटाळा प्रकरणात तुरुंगात असलेले ‘आप’चे खासदार संजय सिंह यांची जामीन याचिका आज शुक्रवारी दिल्ली उच्च न्यायलायाने फेटाळली. संजय सिंह यांच्या जामीन याचिकेवरील निर्णय गुरुवारी न्यायालयाने राखून ठेवला होता. न्यायालयाने सर्व पुरावे काळजीपूर्वक तपासण्याची गरज नाही. सिंह हे दोषी नसतील अशी जराही शंका आल्यास न्यायालयाने त्यांच्या बाजूने निकाल द्यावा, असा युक्तिवाद संजय सिंह यांचे वकील मोहीत माथूर यांनी केला. ईडीने सिंह यांना 60 दिवसांहून अधिक काळ तुरुंगात ठेवले आहे, तरीही त्यांच्या हाती काहीच लागलेले नाही याकडेही माथूर यांनी लक्ष वेधले.