खाणं आणि बरंच काही – वन डिश मिल

आरती देवगांवकर << [email protected] >>

पोटभरीचा आणि झटपट होणारा हा एकच प्रकार आहे असे मात्र नाही. ‘वन डिश मिल’ याचा अर्थ एकच पदार्थ, जो खाऊन जेवणाची भूक भागते. ज्यातून नेहमीच्या स्वयंपाकातून मिळणारे जवळपास सगळे अन्न घटक मिळू शकतात. यात अनेक प्रकार करता येऊ शकतात. आपल्या महाराष्ट्रात पूर्वापार केले जाणारे कितीतरी पदार्थ असेच आहेत.

एखादा दिवस असा उजाडतो की, संध्याकाळपर्यंत आपण खूप दमलेलो असतो. कधी घर आणि ऑफिसमध्ये खूप काम पडलेले असते, तर कधी एखाद्या कार्यक्रमाला जाऊन दमून घरी आलेलो असतो. शरीर आणि त्याहीपेक्षा मन दमलेले असते. आता काही करू नये असे वाटत असते, पण ‘पोट’ नावाचा आपला एक अवयव गप्प बसायला तयार नसतो. एकवेळ आपण त्याच्याकडे दुर्लक्ष करू, पण घरातील इतर माणसांच्या पोटाची काळजी तर घ्यावीच लागते. मग अशा वेळी हमखास मदतला येते ती मुगाची खिचडी. खिचडीचा एक कुकर लावला आणि काम झाले असे वाटेल खरे, पण ते काही तितकेसे खरे नाही. त्याच्या जोडीला कढी, तळलेले  पापड आणि लिंबाचे लोणचे एवढे तरी लागतेच. तेव्हा खरी खिचडी खाण्याची मजा! अर्थात असे असले तरी ही खिचडी म्हणजे वन डिश मिल!

हिंदुस्थान जेवणात रोज रोज चारी ठाव स्वयंपाक करावा लागतो. पोळी-भाकरी, भात, भाज, पातळ म्हणून वरण, आमटी, सार यांपैकी काहीतरी, शिवाय घरात बनवून ठेवलेल्या किंवा आणलेल्या चटण्या, लोणची, झालंच तर कोशिंबरी आणि गोड काही बनवले तर काय, ‘सोने पे सुहागा’च! ज्यांना मनापासून हे  करायला आवडते त्यांचा काही प्रश्नच नाही, पण कित्येकांना वेळेच्या सवडीने, स्वतःच्या आवडीने हे सगळे रोज करणे जमत नाही. कित्येकदा रोज रोज तेच करण्याचा आणि खाण्याचादेखील कंटाळा येतो. नव्याने स्वयंपाक करायला शिकलेली मुले-मुल जेव्हा शिक्षणाच्या, नोकरीच्या निमित्ताने घराबाहेर पडतात तेव्हा त्यांना आपले शिक्षण, नोकरी सांभाळून असा स्वयंपाक करणे जमतेच असे नाही. मग अशा लोकांनी काय उपाशी राहावे? नाही ना? तेव्हा त्यांच्या मदतीला येते अशी वन डिश मिल. थोडे तांदूळ, हवी ती डाळ, घरात असतील त्या भाज्या आणि हाताला लागतल ते मसाले घालून खिचडीचा कुकर चढवला की, झाला स्वयंपाक.

अर्थात, पोटभरीचा आणि झटपट होणारा हा एकच प्रकार आहे असे मात्र नाही. ‘वन डिश मिल’ याचा अर्थ एकच पदार्थ, जो खाऊन जेवणाची भूक भागते. ज्यातून नेहमच्या स्वयंपाकातून मिळणारे जवळपास सगळे अन्न घटक मिळू शकतात. यात अनेक प्रकार करता येऊ शकतात. आपल्या महाराष्ट्रात पूर्वापार केले जाणारे किततरी पदार्थ असेच आहेत. कुळथाचे किंवा ज्वारीचे शेंगोळे या पिठात तिखटमीठ, ठेचलेला लसूण घालून त्याच्या वळकटय़ा करून त्या फोडणीच्या पाण्यात शिजवतात. वरणफळे, ज्याला काही प्रदेशात चकोल्या म्हणतात, तर गुजरातेत हाच पदार्थ डाळ ढोकळी म्हणून समोर येतो. यात आधी शिजलेली डाळ फोडणीला घालतात. कणीक मळून त्याच्या पोळ्या लाटून चौकोन तुकडे करून त्या आमटीत शिजवतात. वरून तूप टाकून गरमागरम वरणफळे खाणे म्हणजे निव्वळ सुख! यात वरणात पडणारे जिन्नस घरोघरच्या आवडीप्रमाणे बदलतात. तसेच कणीकदेखल. काही घरी नुसते मीठ घातलेल कणीक वापरतात, तर काही ठिकाण तिच्यात तिखट, मठ, ओवा, जिरे इत्यादी घालतात. अशीच मेथी किंवा शेपूची कोरडी भाजी करून त्यात कणकेचे तुकडे शिजवून मेथफळे किंवा शेपुफळे केल जातात.

धिरडी, आंबोळ्या, डोसे, पॅनकेक्स हे सगळे एकाच प्रकारचे भाऊबंद. घटक पदार्थ जरा वेगवेगळे. कध डाळ-तांदूळ भिजवून, वाटून किंवा कधी आधीच दळून आणून ठेवून त्या पिठापासून बनतात. यांचाच थोरला भाऊ म्हणजे थालीपठ किंवा धपाटे. धपाटे म्हटल्यावर तुम्हाला पाठीवर मिळणारे आठवतील, पण मी म्हणतेय ते धपाटे ही मराठवाडय़ातील खासियत आहे. ज्वारीच्या पिठात थोडे बेसन, तिखटमीठ, किसलेला कांदा, लसूण इत्यादी मालमसाला घालून पिठावर भाकरी थापतात आणि तव्यावर तेल सोडून भाजतात. दाण्याची चटण आणि दही यांच्याबरोबर हे अत्यंत छान लागतात.

भाताचेही अनेक प्रकार करता येतात. इच्छा आणि कल्पनाशक्ती असेल, तर यासाठी अक्षरशः ‘स्काय इज द लिमिट’ म्हणता येईल. मसालेभात, पुलाव, बिर्याणी, चित्रान्न, दहीबुत्ती हे झाले नेहमीचे प्रकार. निरनिराळ्या भाज्या, मसाले घालून त्या त्या भाजीच्या नावाचा भात तयार करतात. या तांदळापासून बनणारी, कमी कालावधीत कैक लोकांच्या आवडीच बनलेल इडली हे तर वेगळेच प्रस्थ. लुसलुशीत पांढरीशुभ्र इडल, सोबत लालचुटुक सांबार आणि हिरवी-पांढरी चटण हा कितीतरी घरांमधील आवडता नाष्टा, अगदी जेवणासाठीदेखील पसंतचा मेन्यू.

हे तर झाले आपले नेहमी घरोघरी होणारे पदार्थ. जागतिकीकरणाच्या या काळात आधी पुस्तके आणि आता तर इंटरनेटमुळे जगभरातील पदार्थ कसे करायचे ते समजून घेणे सोपे झाले आहे. त्यामुळे पास्ता, पिझ्झा, रिसोतो, नूडल्स यांसारख्या पदार्थांनी आपल्या जेवणाच्या ताटात जागा मिळवली.

आपण ‘वन डिश मिल’ म्हणत असलो तरी यातल पदार्थ करताना एकापेक्षा जास्त पदार्थ बनवावे लागतात. कित्येक पदार्थांच्या तयारीला एवढा वेळ लागतो की वाटते, यापेक्षा भाजीपोळी पटकन बनवून झाली असती. तरीदेखील या चव आवडतात, इतरांपेक्षा आपण वेगळे पडू नये ही मनातील भावना, नवे काही तरी चाखून पाहण्याच मानवी प्रवृत्त अशा गोष्टींमुळे हे पदार्थ केले आणि खाल्ले जातातच. मग किती का खटाटोप करायला लागो. जोपर्यंत माणसाची नावन्याची ओढ टिकून आहे, जिभेचे चोचले पुरवण्याची हौस बाकी आहे, तोपर्यंत असे अनेकानेक पदार्थ तयार होत राहतील. तुम्हीही त्याची चव घेतली असणारच. ज्यांनी घेतली नसेल त्यांनी अवश्य घ्या. मस्त खा नि स्वस्थ रहा!

(लेखिका अनुवादक व समतोल या द्वैमासिकाच्या संपादक आहेत.)