
छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालय आणि द म्युझियम सोसायटी ऑफ इंडियाच्या वतीने 5 ऑगस्टला ‘बदरवा बरसन को आए’ हा ज्येष्ठ गायिका आशा खाडिलकर यांच्या गाण्यांचा विशेष कार्यक्रम होणार आहे. संग्रहालयातील कुमारस्वामी सभागृहात संध्याकाळी 6 वाजता हा कार्यक्रम होणार आहे. माणिक वर्मा, पं. यशवंतरावबुवा जोशी, पं. जितेंद्र अभिषेकी, पं. शंकरराव अभ्यंकर अशा विविध घराण्यांतील गुरूंकडून खाडिलकर यांनी तालीम घेतली. किराणा, आग्रा आणि जयपूर या तिन्ही घराण्यांची खासियत त्यांच्या गाण्यांमध्ये पाहायला मिळते.





























































