सीएएच्या समर्थनार्थ ‘अभाविप’ची नगरमध्ये तिरंगा पदयात्रा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

‘देश के सन्मान में, एबीव्हीपी मैदान में…’ अशी घोषणा देत अभाविपतर्फे नगर शहरात तिरंगा पदयात्रा काढण्यात आली. या पदयात्रेत अभाविप पदाधिकारी यांच्यासह भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्ते, कॉलेज विद्यार्थी व शाळकरी मुले सहभागी झाली होती.

गुरुवारी सकाळी काढण्यात आलेली ही पदयात्रा वाडिया पार्क, माळीवाडा वेस, पंचपीर चावडी, आशा टॉकीज रोड, माणिक चौक, भिंगारवाला चौक, कापडबाजार, तेलीखुंट, चितळे रोडमार्गे गांधी मैदान येथे पोहचली. गांधी मैदान येथे पदयात्रेचा समारोप झाला.